• Tue. Jun 6th, 2023

एक कोरोना रुग्ण सापडला तर आजूबाजूची २0 घरे होणार सील

लखनौ:उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. मास्क, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन ही त्रिसुत्री वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २0 घरे कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २0 घरे सील केली जातील. कोरोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ६0 घरे सील केली जातील.
राज्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून हे नवे नियम लागू करण्यात आलेत. शहरी भागांमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यास २0 घरे सील केली जातील आणि त्या भागाला कंटेनमेंट झोन असे जाहीर केले जाईल. एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ६0 घरे सील करुन त्यांना कंटेनमेंट झोन जाहीर केले जाईल. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील.

इमारतींसाठी वेगळे नियम तयार करण्यात आले आहेत. एखाद्या इमारतीमध्ये एखाद्या मजल्यावर कोरोना रुग्ण आढळून आला तर संपूर्ण मजला सील केला जाईल. एखाद्या ठिकाणी एकाहून अधिक रुग्ण आढल्यास त्या इमारतीला कंटेनमेंट झोन जाहीर केले जाईल. १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आला नाही तर कंटेनमेंट झोनमधून या इमारतींचे नाव हटवले जाईल.
उत्तर प्रदेशचे अपर मुख्य सचिव (आरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे चार हजार १६४ नवे रुग्ण आढळून आलेत. राज्यात १९ हजार ७३८ अँक्टीव्ह रुग्ण आहेत. उत्तर प्रदेशमध्ये आठ हजार ८८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. उत्तर प्रदेशमध्ये आत्तापयर्ंत तीन कोटी ५४ लाख १३ हजार ९६६ चाचण्या झाला आहेत. रविवारी ७८ हजार ९५९ नमुने आरटी पीसीआर चाचण्यांसाठी पाठवण्यात आले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *