उमरखेड : येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांना पुसद पंचायत समितीचा अतिरिक्त प्रभार देऊन जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कामाचा गौरव केला असल्याचे दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापयर्ंत शासनाच्या विविध योजना असून त्या ग्रामसेवक मार्फत प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्यात महत्त्वाचा पुढाकार घेणारे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे यांचा ग्राम विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे गटविकास अधिकारी म्हणून आपली भूमिका पार पाडून नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी आपण येथे बसलो आहोत आणि शासनाच्या प्रत्येक योजना नागरिकापयर्ंत पोहोचल्या पाहिजेतच अशी भावना हृदयी ठेवून काम करण्यात त्यांचा हातखंडा बसला आहे आपल्या कर्मचार्यांकडून कशा पद्धतीने काम करून घ्यायचे हे त्यांना चांगलेच माहित असल्याने प्रत्येक जणांचे काम वेळेवर करण्याचा त्यांचा मानस असतो पंचायत राज समितीला उमरखेड तालुक्यातील सर्व गावांचा विकासात्मक आढावा देऊन त्यांनी योग्यरित्या समितीसमोर मांडणी केली यावर समितीने देखील त्यांच्या कामावर समाधान व्यक्त केले अल्पावधीतच उमरखेड पंचायत समितीच्या आवारात त्यांनी सुशोभीकरण व गार्डन तयार केले तालुक्यात पाणी टंचाई चा आढावा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून गजेत असून तालुका टँकरमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे वानखेडे सांगतात शिवाय माझी वसुंधरा अभियानात जिल्ह्यात एकमेव उमरखेड तालुक्यातील विडूळ गावाची निवड झाली असून सदर योजनेवर देखील वानखेडे संपूर्ण लक्ष ठेवून आहेत. त्यांच्या या कामाचा आढावा घेऊन ३१ मार्चपासून प्रवीण वानखेडे यांना पुसद पंचायत समितीचा अतिरिक्त कारभार पुढील सूचना प्राप्त होईपयर्ंत वरिष्ठांनी दिला आहे. दोन पंचायत समितीचा कारभार हातात आल्याने त्यांच्या समोर दोन तालुक्यातील नागरिकांना सेवा पुरविण्याची जबाबदारी आली आहे. माजी मुख्यमंत्री व माजी राज्यमंत्री तसेच तीन आमदार असलेल्या तालुक्यात प्रशासकीय सेवा देण्याचे आव्हान बीडीओंसमोर असून हे आव्हान वानखेडे लीलया पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उमरखेडच्या बीडीओंकडे पुसदचा अतिरिक्त प्रभार
Contents hide