• Wed. Jun 7th, 2023

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला कमी लसींचा पुरवठा-राजेश टोपे

मुंबई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलेल्या आरोपांनंतर आता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यासोबतच केंद्र सरकारवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी फक्त ७.५ लाख लसीचे डोस दिले आहेत. उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४0 लाख, गुजरातला ३0 लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लसींचे वाटप झाले आहे. या ऑर्डरला घेऊन मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकार्‍यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत, असे राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यासोबतच, त्यांनी राज्यातील रुग्णांची आकडेवारी देऊन मिळणार्‍या लसींचे प्रमाण कसे कमी आहे, त्याविषयी देखील पत्रकार परिषदेत माहिती दिली.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम आणि इतर बाबींवर टीका केली होती. त्यामध्ये राज्यात होणार्‍या लसीकरणापासून ते राज्य सरकारच्या कोरोनाबाबतच्या एकूण धोरणावर टीका केली होती. त्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद उभा राहू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. हर्ष वर्धन यांच्या आरोपांना आता राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.

महाराष्ट्रात सध्या अँक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३0 लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लसी का? असा सवाल राजेश टोपे यांनी केला आहे. सर्व पद्धतीने केंद्राशी समन्वय ठेवला आहे. ७ दिवसाला ४0 लाख लसीचे डोस लागतातच.त्यामुळे आठवड्याला ४0 लाख आणि महिन्याला १ कोटी ६0 लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातली लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहू शकेल, असे देखील टोपे यावेळी म्हणाले.
आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडले आहे. बुलढाण्यात फक्त एक दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्षवर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५0 टक्के रुग्ण असणार्‍या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?, असा सवाल टोपेंनी केला आहे. मला कुणावर आरोप करायचे नाहीत. राज्यातले सर्व कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केलीय, दर आठवड्याला ४0 लाख लसींची मागणी आमची पुरवावी ही आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *