आली रम्य प्रभा….…

    आज सूर्याची किरणे
    आली रम्य प्रभा सवे ।
    माझ्या भाचीच्या स्वागता
    मज अन्य काय हवे? ।।
    तेज सूर्यासम तिचा
    राहो तेवत सदैव ।
    तिच्या अंगणी येण्याने
    पालटले माझे दैव ।।
    बोल बोबडे कानास
    फार मधूर वाटते ।
    मामा शब्द ऐकताना
    हर्ष मनी संचारते ।।
    वाढदिवसाचा क्षण
    आज सोनेरी वाटतो ।
    माझा पांडुरंग तिच्या
    बघा सोबत खेळतो ।।
    फूल नाजूक आरुषी
    आहे कळी उमलती ।
    एक वर्षाची जाहली
    चला पेटवू पणती ।।
    देऊ शुभेच्छा मिळून
    माझ्या लाडक्या भाचीला ।
    आई वडिलांचा राहो
    सदा आशीर्वाद तिला ।।

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी
    ता.दारव्हा, जि.यवतमाळ
    मो.८८०५८३६२०७