मुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या चाचण्यांचे दर कमी करून राज्य सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. राज्यात आता नव्या दरांनुसार कोरोना चाचणीसाठी ५00 रुपये आकारले जाणार आहेत. याआधी ज्या चाचणीसाठी ७00 रुपये दर आकारले जात होते, ती चाचणी आता फक्त ५00 रुपयांमध्ये करता येणार आहे. सर्व खासगी प्रयोगशाळांना कोरोना चाचणीचे हे दर लागू असतील. यासोबतच रॅपिड अँटिजेन टेस्टच्या दरांमध्ये देखील कपात करण्यात आली असून आता ही चाचणी फक्त १५0 रुपयांमध्ये करता येणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घोषणा केली आहे. राज्यातील कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला यापेक्षा जास्त दर आकारता येणार नाहीत, असे देखील आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणार्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणार्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ५00 रुपये आकारण्यात येणार आहे. कोरोनाच्या चाचण्यांचे दर गेल्या काही महिन्यांमध्ये ४ हजार ५00 वरून ५ ते ६ टप्प्यांमध्ये कमी करत आता ५00 रुपयांपयर्ंत कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी राज्य शासनाने सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये कोरोना चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करीत अनुक्रमे आधी १२00, मग ९८0 आणि शेवटी ७00 रुपये असे दर करण्यात आले होते. हे दर संकलन केंद्रावर नमुना देऊन चाचणी करण्याचे होते. जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ५00, ६00 आणि ८00 असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये संकलन केंद्रावरुन नमुना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ५00 रुपये आकारले जातील.
आता कोरोना चाचणी ५00 रुपयांत
Contents hide