अमेरिकेतील नौदल अधिकार्‍यांनी गायले स्वदेस सिनेमाचे गाणे

मुंबई: शाहरुख खानचा २00४ सालात आलेला स्वदेस सिनेमा चांगलाच गाजला होता. तसचं या सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट ठरली. खास करून या सिनेमाचं टायटल ट्रॅक चांगलंच लोकप्रिय झालं. एआर रेहमानने गायलेलं ये जो देस है मेरा हे गाण आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
नुकतच अमेरिकेतील भारतीय दूतावासात काही अमेरिकन नौदल अधिकार्‍यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर किंग खानने देखील हा व्हिडीओ शेअर करत अमेरिकन अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडीओ पाहून शाहरुख खान भावूक झाला आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिड.ीओवर शाहरुख खान आणि एआर रेहमान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २७ मार्चला अमेरिकन नौसेनेच्या चीफ ऑफ नेवल ऑपरेशनच्या वतीने आयोजीत एका कार्यक्रमात नौसेनेच्या काही अधिकार्‍यांनी स्वदेस सिनेमातील हिंदी गाणं गायलं. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी ह्यये वो बंधन है जो कभी नहीं टूट सकता असं कॅप्शन देत हा व्हीडीओ शेअर केला आहे. शाहरुख खानने हा व्हिडीओ पाहून भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांचे आभार मानले आहेत. शाहरुखने ट्विट करत म्हंटलं आहे. हे गाणं शेअर केल्याबद्दल आभार सर. हे खुपच सुंदर आहे. जेव्हा आम्ही सिनेमा करत होतो त्या काळात मी पुन्हा गेलो.
आम्ही खुप प्रेमाने या सिनेमात आणि गाण्यात जीव ओतला होता. या सिनेमा आणि गाण्यावर आम्हाला विश्‍वास होता. आशुतोष गोवारिकर, एआर रहमान, रॉनी स्क्रूवाला आणि सर्वांचे आभार ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं. असं ट्वीट शाहरुखने केलं आहे. तर एआर रेहमानने हा व्हिडीओ शेअर करत स्वदेस कायम राज्य करेल असं म्हणत त्याने व्हिड.ीओ शेअर केला आहे. २00४ सालात आलेल्या स्वदेस सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसती तरी चाहत्यांनी मात्र या सिनेमाला चंगली पसंती दिली होती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!