• Thu. Sep 28th, 2023

अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चंदीगडच्या भाजप खासदार किरण खेर यांना मल्टीपल मायलोमा असल्याचे निदान झाले आहे. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. याबाबतची माहिती किरण खेर यांचे पती दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करत दिली आहे.
अनुपम खेर यांनी गुरुवारी सकाळी एक भावूक ट्विट करत किरण खेर यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की मी ही माहिती यासाठी शेअर करत आहे जेणेकरुन अफवा पसरु नयेत. किरण खेर यांना मल्टीपल मायलोमाचे निदान झाले आहे. हा एक ब्लड कॅन्सरचा प्रकार आहे. किरण यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्या यातून पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होऊन बाहेर पडतील, असा आम्हाला विश्‍वास आहे. त्या नेहमीच लढवय्या आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. किरण जे काही करतात ते मनापासून करतात त्यामुळे लोक त्यांच्यावर भरभरून खूप प्रेम करतात. त्यासाठी तुमचे प्रेम प्रार्थनेच्या रुपातून असेच पाठवत रहा. त्यांची प्रकृती आता ठीक असून त्यात सुधारणा होत आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. अनुमप आणि सिकंदर.
६८ वर्षीय किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरु असल्याचे समजते. किरण खेर यांनी २0१४ मध्ये पहिल्यांदा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्या निवडून आल्या. २0१९ मध्येही त्यांनी निवडणूक जिंकली होती.
त्यांनी १९८३ मध्ये पंजाबी चित्रपट आसरा प्यार दा मधून चित्रपटसृष्टीत पर्दापण केले होते. त्यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,