• Sat. Jun 3rd, 2023

अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

यवतमाळ : येथील एका अंगणवाडी सेविकेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या पिंपळगाव परिसरात उघडकीस आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, त्या महिलेच्या आत्महत्येप्रकरणी सुपरवायझरविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेळघाटमधील हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकरण सध्या राज्यभर गाजत आहे.
माया किशोर गजभिये (वय ५0) रा. विसावा कॉलनी पिंपळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. गजभिये या अंगणवाडी सेविका होत्या. त्यांनी गुरुवारच्या रात्री उशिरा पिंपळगाव परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
दुसर्‍या दिवशी सकाळी घटनेची माहिती वार्‍यासारखी पसरताच शहर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून घटनेची नोंद केली. सुपरवायझर शोभा पटले यांच्या कामाच्या मानसिक त्रासाला कंटाळून गजभिये यांनी आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून, याप्रकरणी शहर पोलिसांनी सुपरवायजर शोभा पटले यांच्याविरोधात भादंविचे कलम ३0६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत शहर पोलिसांनी या प्रकरणाची दोन्ही बाजूने चौकशी सुरू केली आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *