हिंगणघाट : अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात गुरुवारी तीन जणांची साक्ष नोंदविण्यात आली असून, या खटल्यातील आजपर्यंत एकूण २९ साक्ष नोंद पूर्ण होऊन, गुरुवारला साक्ष तपासमध्ये पोलिस निरीक्षक सत्यावीर बंडीवार, मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव व फ्रांसिस परेरा यांची साक्ष पूर्ण झाली. तर बचाव पक्षाकडून वेळेअभावी उलट तपासणी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांची उलट तपासणी अर्धवट राहिली.
अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्यासमोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली दुपारी ३ .३0 वाजेपयर्ंत या प्रकरणाचे सलग कामकाज चालले. सुरुवातीला या प्रकरणात पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांची उलट तपासणी पूर्ण झाली, तर उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांची साक्ष पूर्ण होऊन जियो कंपनीचे नोडल अधिकारी फ्रांसिस परेरा, पुणे यांची कोरोना प्रादुर्भावाच्या संकटामुळे ते प्रत्यक्ष न्यायालयात हजर न राहू शकल्यामुळे व्हिडीओ कान्फरसिंगद्वारा त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. यापूर्वी अंकिताच्या आईने न्यायालयासमोर सांगितले की आरोपीने माझ्या मुलीला भ्रमणध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे आपल्या साक्षीमध्ये नमूद केले होते. गुरुवारी त्या साक्षीची पुष्टि करण्याकरीता जिओ कंपनीचे नोडल अधिकारी फ्रांसिस परेरा, पुणे यांनी आपल्या साक्षीत १ मार्च २0२0 रोजी 0८ वाजून 0८ मिनिटांनी आरोपी विक्की नगराळे व मृतक अंकिता पिसुड्डे यांच्यात ४0 सेकंदाचे संभाषण झाले असून, आरोपीने तू जर माझेशी लग्न केले नाही तर तुला मी जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती, असे फ्रांसिस परेरा यांनी आपले साक्षी जबाबात सांगितले. विशेष म्हणजे हिंगणघाट जिल्हा न्यायालयात प्रथमच व्हिडीओ क्रान्फ्रेसिंगद्वारा दोन साक्षीदाराची साक्ष नोंदविण्याचा इतिहास या प्रकरणामुळे घडून आला, असे नामवंत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. त्यांना यामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील अँड. दीपक वैद्य यांनी सहकार्य केले.
अंकिता जळीत प्रकरणात तपास अधिकार्यांसह तिघांची साक्ष
Contents hide