नाशिक : नाशिक येथे होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही कोरोनाचा फटका बसला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने संमेलन घ्यावे की पुढे ढकलावे असा पेच संयोजकांसमोर उभा राहिला होता. कोरोना स्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय घेण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. अखेर नाशिक येथे होणारे संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महामंडळाने निवदेनाद्वारे याची माहिती दिली आहे.
नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे हे संमेलन स्थगित करण्यात आले आहे. महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी याची माहिती दिली. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते. पण, नोव्हेंबर २0२0च्या मध्यापासून कोरोना संक्रमण कमी झाले. डिसेंबरमध्ये आटोक्यात आले आणि महाराष्ट्राने कोरोनावर मात केली असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे साहित्य महामंडळाने नाशिकच्या लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारून ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते, असे मडळाने म्हटले आहे.
संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने कोरोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, तो कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. उलट प्रभाव वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकार्यांशी चर्चा केली. नाशिकमधून येणार्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणार्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती मंडळाने दिली आहे.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024