मुंबई : राज्यातील वीज दरामध्ये सरासरी दोन टक्के कपात हे अर्धसत्य असून सर्व वीज ग्राहकांना सरासरी देयक ७.२८ रुपयावरून ७.२६ रुपये प्रति युनिट होणार आहे. सरासरी कपात दोन पैसे प्रति युनिट अर्थात 0.३ टक्के होईल. त्यामुळे नवीन काहीही घडलेले नसल्याचे मत महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले आहे.
आयोगाने गेल्यावर्षीच पुढील पाच वषार्साठी बहुवर्षीय दरनिश्चिती आदेश जाहीर केला आहे. त्यामधील ही आकडेवारी आहे. काही ठराविक वर्गवारीतील ग्राहकांचा एकूण सरासरी देयक दर एक ते चार टक्के कमी झाला आहे. मुळात राज्य सरकार, आयोग वा महावितरण कंपनीने नवीन काही केलेले नाही. एकूण घट, कपात ही फक्त सरासरी दोन पैसे प्रति युनिट म्हणजे 0.३ टक्के इतकीच आहे.
Related Stories
April 19, 2024
April 16, 2024