- पळस फुलतो । उन्हातही जसा ।
- उत्साहित तसा । रहा वेड्या ।।
- क्षणभर त्यास । वाटते पहावे ।
- परंतु जगावे । मात्र नाही ।।
- पळस फुलांचे । आयुष्य थोडेच ।
- आनंदाकडेच । तरी ध्यास ।।
- काय सुंदरता ? । पाहता डोळ्याने ।
- माणूस कर्माने । श्रेष्ठ होतो ।।
- पळसाचे फुलं । फार उपयोगी ।
- मनास निरोगी । ठेवतात ।।
- कोणी चहासम । वापर करून ।
- घेतात प्राशुन । शुष्क फुले ।।
- अजु म्हणे बघा । पळस होऊन ।
- उन्हात राहून । बहरण्या ।।
- शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी, ता.दारव्हा जि.यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७