नवी दिल्ली : बॉलिवूडचा हिरो नंबर वन असलेला गोविंदा भले चित्रपटांपासून दूर असेल, मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमीच अँक्टिव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. गोविंदा हा त्याचा सहज साभिनय, नृत्य आणि विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळेच गोविंदाचे जगभरात चाहते आहेत. गोविंदाच्या नव्या पोस्टची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या चाहत्यांना नेहमीच खूश ठेवणार्या गोविंदाने त्याची मुलगी नर्मदा अहुजासोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बाप आणि लेक एका खास अंदाजात डान्स करत आहेत. गोविंदाची मुलगी आपल्या वडिलांच्या डान्सची हुबेहुब कॉपी करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती म्हणजे गोविंदाचे डान्स स्टेप दरम्यानचे एक्प्रेशन लक्ष वेधून घेतात. जी गोविंदाची खासियत आहे. त्याची मुलगी नर्मदा ही देखील वडिलांप्रमाणे एक्प्रेशन देण्यात माहिर असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ आतापयर्ंत लाखो लोकांनी पाहिल्याचे दिसून येत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओवर कौतुकाचे कमेंट्स येत आहेत. गोविंदाने १९८0 च्या दशकामध्ये अँक्शन आणि डान्सिंग हिरोच्या रूपात आपल्या करिअरला सुरूवात केली. यानंतर ९0 च्या दशकात त्याने एक कॉमेडी हिरोच्या स्वरूपात स्वत:ला बॉलिवूडमध्ये प्रस्थापित केले. त्याची इल्जम, हत्या, जीते है शान से आणि हम या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. १९९२ चा रोमँटिक चित्रपट शोला और शबनम ने युवा एनसीसी कॅडेटची भूमिका वटवली होती. ज्याला खूप प्रशंसा मिळाली होती. सध्या गोविंदा चित्रपटांपासून काहीसा दूर असल्याचे दिसून येत आहे. मात्र छोट्या-छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून गोविंदा आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो.
Related Stories
April 16, 2024