- फार माजली दंगल तेथे
- काल जाळली जंगल तेथे
- आदिमानसा हाकारूनी
- कोण नांदली मंगल तेथे
- स्वैर वनचरे पशुपक्षीही
- मान्य आमचा अंमल तेथे
- रंगभेद अन जातीपाती
- प्रश्न भासतो बंडल तेथे
- आग लावली जर हक्काला
- पेटणार मग चंबल तेथे
- आज घेतले सूर्या माथी
- पाय नाचले संदल तेथे
- तोच अंगठा जपला त्याने
- ज्ञान बोलती संबल तेथे
- डॉ नंदकिशोर दामोधरे,
- अमरावती
- 9890911263