अमरावती : ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम महापालिकेकडून डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व दंतचिकित्सा महाविद्यालयात सुरळीत राबविण्यात येत आहे.त्यात साठीपुढील ज्येष्ठांसह सहव्याधी असणार्या ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. सहव्याधी असणा-या व्यक्तींनी डॉक्टरचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, महापौर चेतन गावंडे यांनी आज पीडीएमसी व डेंटल कॉलेजमधील लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. पीडीएमसीचे अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख, डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेश गोंधळेकर, आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे आदी उपस्थित होते.अमरावती महापालिकेच्या डेंटल कॉलेज व पीडीएमसी या रुग्णालयात (शासकीय रुग्णालय स्तर) कोव्हीड १९ लसीकरणाच्या तिसर्या टप्प्याला सुरुवात झाली असून याशिवाय प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये, केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विमा योजनेमध्ये नोंदणीकृत रुग्णालये अशा योजनांमध्ये नोंदणीकृत असलेल्या ८ खाजगी रुग्णालये / सेंटर याठिकाणी ज्या रुग्णालयात शासकीय निकषानुसार जागा, लस साठवणुकीची सोय, लस देण्याकरिता आवश्यक परिचारिका व इतर मनुष्यबळ असल्यास याठिकाणी कोव्हीड १९ लसीकरण सेंटर निश्चित करण्यात येऊन टप्प्याटप्प्याने या रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. शहरात लसीकरण कार्यक्रमाची सुरळीत अंमलबजावणी होत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले. शासनाच्या निदेर्शानुसार पालिकेकडून ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून त्यात ६0 वषार्पेक्षा अधिक वयोगटातील नागरिक, तसेच सहव्याधी (को – मॉर्बेडिटी) असणारे ४५ ते ५९ वर्ष वयाचे नागरिक यांचे लसीकरण होत आहे. ४५ ते ५९ वर्ष वयाच्या सहव्याधी असणा-या नागरिकांना लस घेण्याकरिता वैद्यकीय सेवा देणा-या नोंदणीकृत व्यावसायिक यांचे संबंधित प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024