६ रुग्णांचा मृत्यू , ४५७ पॉझिटिव्ह

अमरावत ी: जिल्हयात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये पुन्हा वाढ पहावयास मिळाली असून २१ मार्च रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसान जिल्हयात ४५७ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. परिणामी जिल्हयात ४५ हजार ३९५ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणार्‍यांची संख्या देखिल वाढली असून आज ६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यत ६३0 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जिव गमावला आहे. ४0 हजार ४४0 रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असून ४ हजार ३६५ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. जिल्हयात रिकव्हरी रेट ८९.00 इतकी तर डब्लिंग रेट ३२.४ इतका असुन मृत्यू दर १.३९ इतका आहे.
जिल्हयात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये चढ उतार पहावयास मिळत असून कोरोनामुळे मृत्यू होणार्‍या रुग्णांची संख्या देखिल सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसुन येत आहे. देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असुन नागपूर, पुणे, मुंबई यासह इतर ठिकाणी कोरोना रुग्णामध्ये मोठया प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्हयात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देवून केवळ निर्बंध कडक करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारपेठामध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठयाप्रमाणाम गर्दी पहावयास मिळत आहे. कोरोनावर पूर्णताह अंकुश अशक्य असला त्यावर नियंत्रण मिळविता येवू शकते ही बाब जितकी खरी तितकीच नागरिकांनी नियमांचे पालन करने ही बाब देखिल तितकीच खरी म्हणावी लागेल.
२१ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ४५७ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे ४५ हजार ३९५ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत.४0 हजार ४४0 रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६३0 रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून ४ हजार ३६५ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!