नवी दिल्ली : चीनमधून निघलेल्या आणि संपूर्ण जगात हाहाकार घालत असलेल्या कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या जीवनशैलीत आणि सवयीत मोठा बदल झाला आहे. कोरोना महामारीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपण मास्क वापरणे, हात सॅनिटाइझ करणे आणि डिस्टंसिंग पाळण्यासारख्या सवयी स्वत:ला लावून घेतल्या आहेत. यातच एक अत्यंत धक्कादायक आणि चिंता वाढवणारी गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यांपैकी ४४ सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणार्या घातक रासायनिक घटकांचा वापर केला जात आहे.
जागतिक महामारी कोरोना व्हायरसमुळे जगभरात सॅनिटायझरची मागणी वाढली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी रुग्णालयांपासून ते घरा-घरापयर्ंत आणि मोठ्यांपासून ते लहानांपयर्ंत सॅनिटायझरचा वापर सुरू आहे. नुकतीच एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे की आपण ज्या सॅनिटायझरचा वापर करतो, त्यांपैकी ४४ सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढवणार्या घातक रासायनिक घटकांचा वापर केला जात आहे. अशात, सॅनिटायझरचा दीर्घकाळ वापर केल्यास कॅन्सर अथवा त्वचारोग होण्याची भीती आहे का? हे जाणून घेण्यासाठी, व्हॅलिजरने २६0 हून अधिक हॅन्ड सॅनिटायझरवर सविस्तर अध्ययन केले आहे.
४४ सॅनिटायझरमध्ये कॅन्सरचा धोका वाढविणारे घटक..!
Contents hide