अमरावती : जिल्हयात कोरोनाबाधितांचा आकडा हा ६00 च्या खाली उतरत नसल्यामुळे प्रशासनासमोर पुन्हा संकट उभे ठाकले आहे. ६ मार्च रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात ६३१ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून आतापर्यत ३९ हजार ७८ कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.५५५ रुग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला असून ३१ हजार ५५५ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे तर ७ हजार पेक्षा जास्त रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपाचर सुरू आहे.
जिल्हयावर दिवसेंदिवस कोरोनाचे सावट गळद होत असल्याचे दिसुन येत आहे. विशेष म्हणजे र्मयादित संचारबंदीचा कुठलाच परिणाम हा कोरोनावर होत नसुन रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वृध्दी होत आहे. जिल्हयातील नागरीक अदयापही कोरोना या महामारीचे गांभीर्य संमजुन घेत नसुन मास्क लावणे, सोशल डिस्टन्सींग या नियमांचे सर्रास उल्लंधन होत आहे.इतक्या भयावह परीस्थितीतही अनेक संघटना या लॉकडाऊनच्या विरोधात वक्यव्य करीत असुन व्यापारी बाजारेपठा सुरू करण्याची मागणी करीत असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न हा महत्वपूर्ण असला तरी परिस्थिती हाताबाहेर जाण्याबाहेर जाण्याआधी प्रशासनाने योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला देखिल अनेक सुज्ञ नागरीक देत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या काही दिवसापासुन जिल्हयात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाच्या पहिल्या वेळेपेक्षाही दुसर्या लाटेमध्ये रूग्णांची संख्या झपाटयाने वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. प्रशासनाने जिल्हयात आठ दिवसाचा लाऊकडाऊन घोषीत केला होता मात्र दोन दिवसापूर्वीच अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यामुळे बाजारपेक्षा आता खुल्या करण्यात आल्या आहे. इतक्या भयावह परीस्थितीतही अनेक अमरावती करांमध्ये बेजबाबदारपणा दाटुदाटू भरला आहे. कोरोना हा प्रकारच मुळात नसल्याचे अनेकांचे मत असल्यामुळे मास्क तसेच सोशल डिस्टन्सींग अशा नियमांचे दिवसा ढवळया उल्लंधन करीत असल्याचे दिसुन येत आहे. जिल्हयात वाढत्या कोरोना रुग्णाबरोबरच मृतांचा आकडा देखील झपाटयाने वाढत चालला आहे. रुग्णांचा रिकव्हरी रेट देखील कमी झाला झाल्याचे पहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे कोरोना महामारीमुळे जनसामान्याचे हाल होत असुन रोजगाराचा प्रश्न पुन्हा एैरणिवर आला आहे.६ मार्च रोजी जिल्हयात ६३१ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.त्यामुळे जिल्हयात आतापर्यत ३९ हजार ७८ कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्हयात ३ कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असुन ५५५ रूग्णांचा आतापर्यत मृत्यू झाला आहे. ७ हजार पेक्षा जास्त रुग्णावर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सुरू आहे. तर ३१ हजार ५५५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
३ रुग्णांचा मृत्यू, ६३१ नवे पॉझिटिव्ह
Contents hide