यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल – मे २0२१ मध्ये आयोजित करण्यात येणार्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१0) वी परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २0 मे २0२१ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दिनांक २३ एप्रिल ते दिनांक २१ मे २0२१ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच इ. १0 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व तत्सम परीक्षा दिनांक १२ एप्रिल ते २८ एप्रिल व इ.१२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी तत्सम परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल २0२१ या कालावधीत प्रचलित पध्दतीने व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
राज्यात कोविड -१९ विषाणूचा प्रादूर्भाव अद्यापही सुरु आहे. त्या अनुषंगाने उपरोक्त परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निधर्ाीत कालावधीत पार पडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापी, विविध समाज माध्यम, प्रसार माध्यमाद्वारे इ. १0 वी व इ. १२ वी परीक्षेसंदर्भात विविध बातम्या व अफवा प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या परीक्षेशी संबंधीत घटकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मंडळामार्फत सर्व संबंधीत घटकांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संभ्रम निर्माण करणार्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. या संदर्भात मंडळामार्फत वेळोवेळी पूर्वीप्रमाणे अधिकृत निवेदने मंडळाच्या संकेतस्थळावर व प्रसिध्दी माध्यमांद्वारे प्रसिध्द करण्यात येतील. तसेच परीक्षेच्या अनुषंगाने विभागीय मंडळामार्फत या संदभार्तील लेखी सुचना वेळोवेळी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात येतात. त्याच सुचना अधिकृत मानण्यात याव्यात.
कोविड – १९ विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर आयोजित एप्रिल – मे २0२१ मधील लेखी, प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. त्याचे काटेकोर पालन करून सर्व विद्यार्थ्यांनी उपरोक्त परीक्षांना तणावमुक्त वातावरणात सामोरे जावे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
१0 वी, १२ वी परीक्षेसंदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नये
Contents hide