• Wed. Jun 7th, 2023

होळीच्या मानगुटीवर कोरोना !

होळी…….हिंदूचाच नाही तर सर्वांचा सण. या होळीत लोकं ज्याप्रमाणे रंग खेळतात. त्याप्रमाणे एकमेकांच्या घरी जावून गुलालही उधळतात. एकमेकांच्या घरची पुरणपोळी खातात. त्यातच एकामेकांच्या घरी जावून नाश्ताही करतात. पर्यायानं सांगायचं म्हणजे होळी हा सण आनंदानं साजरा करतात.
या वर्षी ज्याप्रमाणे होळी आहे. त्याचप्रमाणे या होळीच्या महापर्वावर कोरोनाचेही सावट आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असून तो लगट करणाराही रोग आहे. त्यातच कोरोनाचं संक्रमण एकमेकांना हात लावताच होतांना दिसत असल्यानं लोकांमध्ये भयंकर घाबरटपणाचं वातावरण आहे. काही लोकं जरी चक्क बाहेर पडत असले तरी काही लोकं जास्त करुन घराच्या बाहेर पडणार नाही. तसेच ज्याप्रमाणे लोकं घरी गुलाल लावायचे, तसा गुलाल यावर्षी लावता येणार नाही. कारण यावर्षी कोरोना पुन्हा परतलेला दिसतोय.

कोरोनाच्या या महामारीत कोरोनाला हरवायला सगळं प्रशासन जरी लागलं असलं, तसेच ते प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न जरी करीत असले तरी कोरोना हारतांना दिसत नाही. कारण कोरोना आता दिड वर्षाचा झालाय. तो आता मागं हटायलाच तयार नाही.
होळी हा सण सर्वांसाठीच आनंदाचा आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. मग तो कोरोना का असेना. महत्वपूर्ण गोष्ट अशी की होळी हा सण आपण कशासाठी साजरा करतो? असा विचार केल्यास राग, लोभ, मध, मत्सर याला जाळण्यासाठी साजरा करतो. परंतू काही लोकं होळी साजरा करतांना आपल्या मनात लोभ, मध, मत्सर ठेवतात. त्यातच होळीच्या दिवशी शत्रूत्व काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जातो. विशेषतः ज्यांच्या मनात आज शत्रूत्व काढण्याचा विचार आहे, त्यांच्यासाठी या वर्षी होळी हा आनंदाचा सण आहे. काहीच करायची गरज नाही. फक्त रंग लावायची गरज आहे. तेही कोरोना रोग्यांना सांगून. कोरोना रोग्यांना सांगीतलं की रोगाचा प्रसार. बदलाही पूर्ण करता येतो. हे जरी बरोबर असलं तरी कोरोना हा शत्रूलाही होवू नये असं प्रत्येकांनी वागायला हवं.
कोरोना महामारीनं होळीवरही ग्रहण आणलेलं असून कोरोना मुळंं सगळे लोकं त्रस्त आहेत. त्यातच होळी खेळतांना यावर्षी कोणीही गर्दी करु नये. त्यातच कोणीही कोणाला गुलाल लावू नये, तर फक्त नमस्कार घ्यावा. कारण होळीचा गुलाल लावतांना एखादा जंतू जर आपल्या हातावर असेल तर तो जंतू या गुलाल लावण्याच्या रुपानं ज्याला आपण गुलाल लावला त्याच्या अंगावर जावू शकतो. त्यातच तो जंतू हळूवार त्याच्या शरीरातही प्रवेश करु शकतो. हे विसरता कामा नये. होळी खरंच आनंदाचा क्षण आहे दरवर्षीसारखा. पण दरवर्षीसारखी यावर्षी कोणीही होळी खेळू नका. जेणेकरुन कोरोनामुळं त्यांच्या घरचा दिवा विझेल. तसेच पुरणपोळी किंवा चने किंवा नाश्ता खायला कोणीही जावू नये. आपल्याच घरी नाश्ता बनवून परीवारासह त्याचा आश्वाद घ्यावा.
होळी अवश्य पेटवा. पेटवायला मनाई नाही. पण त्यातून पर्यावरणाचा -हास होईल अशी होळी पेटवू नका. त्यातच होळी पेटवतांना व लाकडं विकत घेतांना जे लाकुड झाड कापून बनवलेलं आहे. अशा कापलेल्या लाकडाची होळी पेटवू नका. त्यातच होळी पेटवतांनाही सुरक्षीत अंतर पाळा. तसेच होळीच्या जळत्या लाकडाची जशी राख तयार होते. तशीच राख आपल्या मनातील राग, लोभ, द्वेष, मद, मत्सराचीही करायची आहे. ते विकार आपल्या मनातून काढून टाकायचे आहेत. होळीच्या निमित्यानं आपल्या मनातून शत्रूत्वपणाची भावना व बदल्याची भावनाही नष्ट करायची आहे. शिवाय ज्या कोरोनाला आपण घाबरतो ना, त्या कोरोनाचीही भीती आपल्या मनातून काढून टाकायची आहे. ज्याप्रमाणे हिरण्यकक्षपूच्या आदेशाने भत्त प्रल्हाद न घाबरता आपली आत्या होलिकाच्या गोदीत बसला होता. असे जेव्हा तुम्ही कराल, तेव्हाच कोरोना जळून राख होईल. पुन्हा तो परत येणार नाही. परत यायला मागपुढं पाहिल. व्यतिरिक्त दारुच्या पाण्यालाही या होळीत स्पर्श करु नका. कारण दारुच्या एका घोटासोबतही कोरोना तुमच्या शरीरात प्रवेश करु शकतो.

महत्वाचं सांगायचं झाल्यास होळी खेळा. पण होळीच्या या आनंदाच्या पर्वात जर तुम्ही वरील नियम पाळले नाहीत, तर हिच होळी तुमच्या आनंदी जीवनाला संपवायला कमी करणार नाही. मग तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. हे निश्चीतच लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे.
अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३६९४५०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *