• Tue. Jun 6th, 2023

हिरेन मृत्यूप्रकरणी निष्पक्ष चौकशी

ByGaurav Prakashan

Mar 11, 2021

मुंबई : मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यूप्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार असून त्यात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सचिन वाझे हे पूर्वी शिवसेनेत होते, मात्र त्यानंतर त्यांनी सदस्यत्वाचे नूतनीकरण केलेले नाही. आता त्यांचा शिवसेनेशी काहीच संबंध नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांच्यावर मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावर आधी फाशी द्या आणि मग तपास करा असे करता येणार नाही, असे सांगत सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हल्ली एखादी घटना घडली की एखाद्याचे चारित्र्यहनन करायचे, त्याला आयुष्यातून उठवायचे अशी पद्धत झालेली आहे. आधी चौकशी करायची नाही, त्या अगोदरच एखाद्याला दोषी ठरवायचे असे कसे होऊ शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
१३ कोटी जनतेच्या आयुष्याशी संबंधित अर्थसंकल्प जाहीर झालाय. १३ कोटी जनतेच्या आशीवार्दावर काम करत आहोत. त्यांच्याकडे लक्ष देणे सरकारचे प्राधान्य आहे. नाणारच्या जनतेचा प्रकल्पाला विरोध आहे. नाणारच्या जनतेच्या मताला शिवसेनेचा पाठिंबा आहे. नाणारला पयार्यी जागा आहे. नाणार प्रकल्पाचे दुसर्‍या ठिकाणी स्थानिक जनतेचा पाठिंबा असेल तर त्या ठिकाणी प्रकल्प होईल.
कांजूरमार्गला कारशेड करणे राज्याचे हिताचे आहे. आरेला कारशेड हे काही वर्षात कमी पडली असती. मुंबईला, राज्याला न्याय मिळेल. कांजूरला कारशेड केल्यास पुढच्या पन्नास आणि शंभर वषार्साठी फायदेशीर ठरेल. अंबरनाथ आणि बदलापूरच्या लोकांना उपनगरात जाता येईल.
महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नसून आम्ही महाविकास आघाडीमधील पक्ष एकत्रितपणे पुढील विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *