• Sun. May 28th, 2023

स्वयंशिस्त न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन अटळ – महापौर

ByGaurav Prakashan

Mar 6, 2021

अमरावती : जगभरात कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले आहे. आपल्या देशातही या साथीचा प्रसार होत असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आहे. अमरावती जिल्ह्यासह अमरावती शहरातही आता कोरोनाचे संक्रमन वाढले आहे. लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत होवून लोकांवर उपासमारीची वेळ आली होती. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र नागरीकांना गांभिर्य नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून विनाकारण फिरणे, गर्दी करणे अंगलट येत आहे. स्वत:ला मयार्दा घालून स्वयंशिस्त न पाळल्यास कोरोनाचे संकट अधिक गढद होणार असून तसे झाल्यास पुन्हा स्वत:हून लॉकडाऊन ओढावून घ्यावा लागेल, असा इशारा महापौर चेतन गावंडे यांनी नागरिकांना दिला आहे.कोरोनामुळे देशातील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. ही साथ वेळीच आटोक्यात येणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आणि उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. कोरोना साथीला आळा घालण्यासाठी अमरावती मध्ये लॉकडाऊन होता. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वप्रकारची दुकाने बंद होती. छोटे- छोटे उद्योग, व्यवसाय बंद राहिल्याने हजारो लोकांचे जगणे मुश्किल झाले होते. हातावर पोट असणार्‍या असंख्य लोकांची उपासमार होत होती. सर्व प्रकारची दुकाने बंद असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. आता लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत अमरावती जिल्हा आणि अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढतच असून ही मोठी चिंताजनक बाब आहे. नागरिक स्वत: मयार्दा पाळत नाहीत, स्वत:ची काळजी घेत नाही, हे महत्वाचे कारण म्हणावे लागले.बाजारपेठ उघडी आहे, मार्केट खुले आहे म्हणून विनाकारण अनेक लोक फिरतात, गर्दी करतात. मला काय होणार नाही या भ्रमात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंन्सिंग न पाळणे, असे प्रकार अनेक लोकांकडून होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे वाढती रूग्नसंख्या आहे. कोरोना आपल्या दरवाजात येवून पोहचला आहे. आतातरी जागे व्हा. अन्यथा परिस्थिती गंभीर होईल, अशी कळकळीची सुचना महापौर चेतन गावंडे यांनी नागरिकांना केली आहे. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव आटोक्यात येईल. याची खबरदारी सर्वांनीच घेणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *