• Fri. Jun 9th, 2023

सेवानवृत्त नायब तहसीलदारांची निर्घृण हत्या

ByGaurav Prakashan

Mar 20, 2021

महागांव : महागांव तहसील कार्यालयातून वर्षभरापुर्वी सेवानवृत्त झालेले नायब तहसीलदार मोहन नामदेव पेंदूरकर (वय ५९ ) यांचा निर्घृण हत्या करण्यात आली. काल गुरुवारी सायंकाळी महागाव ते फुलसावंगी रस्त्यावर पिंपळगाव फाट्यावर हा बरार घडला. पैशांच्या लालसेतून सख्ख्या भाच्यानेच मोहन पेंदूरकर यांना ठार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पवन श्रीराम मंगाम (वय ३३) असे आरोपी भाच्याचे नाव आहे. तो लोहारा (यवतमाळ) येथील रहिवाशी आहे.
मोहन पेंदूरकर हे महागाव येथे नायब तहसीलदार म्हणून सेवानवृत्त झाले. ते मुळचे यवतमाळ येथील रहिवासी होते. पेंदुरकर यांना मुलबाळ नाही.आरोपी भाचा पवन मंगाम हा मोहन पेंदुरकर यांना सातत्याने पैशाची मागणी करायचा. वृद्धापकाळी मीच सेवार्शुषा करणार त्यामुळे संपत्ती माज्या नावे करण्याची धमकी पवन सातत्याने देत होता परंतू मोहन पेंदुरकर मात्र भाच्याला दाद देत नव्हते. यावरून दोघांमध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. काल पवन मंगाम महागांव येथे मामाच्या क्वॉर्टरवर आला. मामाचा काटा काढण्याचा विचार – त्याच्या मनात होता. घरातील कैची त्याने खिशात लपविली व स्विफ्ट डिझायर क्र. एम.एच. २0 सीएच 0८४0 मध्ये मोहन पेंदुरकर यांना घेऊन तो सायंकाळी फुलसावंगी रस्त्याने निघाला. पिंपळगाव फाट्यावर गाडी थांबवून त्याने पैशासाठी हुज्जत घातली व धारदार कैचीने सपासप वार करून मोहन पेंदूरकर यांचा निघृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्यालगत फेकून त्याने वाहनासह यवतमाळकडे पलायन केले. नायब तहसीलदारांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे कळताच यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलिस आणि तहसील प्रशासन लगेच घटनास्थळी पोहोचले. पेंदूरकर यांचा पोटावर व छातीवर मोठे घाव होते, त्यामुळे आरोपीचा छडा लावण्याचे आव्हान होते. यात वेगाने तपास करून एलसीबीने रात्रीच आरोपी पवन मंगाम यास यवतमाळ येथे ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *