नवी दिल्ली : ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झाली. त्यामध्ये सुशांतसिंग राजपूत आणि र्शद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या छिछोरे या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. हा चित्रपट २0१९ मध्ये रिलीज झाला होता. र्शद्धा आणि सुशांत यांच्यासह वरुण शर्मा, प्रितीक बब्बर यांच्याही भूमिका चित्रपटात आहेत. दरम्यान, अभिनेत्री कंगना रणौवतला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी आणि पंगा या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मणिकर्णिकामध्ये राणी लक्ष्मीबाई यांनी इंग्रजांविरोधात दिलेल्या लढाईची कथा आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २0१९ रोजी प्रदर्शित झाला होता. राणी लक्ष्मीबाई यांची प्रमुख भूमिका साकारणा-या कंगानाच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. तसेच पंगा या चित्रपटामध्ये कंगनाने जया निगम या महिला कब्बडी खेळाडूची भूमिका साकारली. हा चित्रपट २४ जानेवारी २0२0 रोजी प्रदर्शित झाला होता.
२00८ साली मधुर भंडारकर दिग्दर्शित फॅशन चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तमच सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच २0१४ साली क्वीन तर २0१५ साली तन्नू वेड्स मन्नू चित्रपटासाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला. कला आणि सुशांतचा छिछोरे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी कंगनाला भारत सरकारने पद्मश्री हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान देऊनही यापूर्वीच गौरवले आहे. दरम्यान, भोसले या हिंदी चित्रपटासाठी मनोज वाजपेयी आणि असुरान या तमिळ चित्रपतासाठी धनुष यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
फीचर फिल्म कॅटेगरी अवॉर्डस
बेस्ट फिचर फिल्म – मारक्कर अरबिकादालिंते सिम्हम (मल्याळम), बेस्ट अँक्ट्रेस – मणिकर्णिका आणि पंगा चित्रपटासाठी कंगना राणावत,बेस्ट हिंदी फिल्म – छिछोरे (सुशांत सिंह आणि र्शद्धा कपूर यांची भूमिका असणारा चित्रपट), बेस्ट अँक्टर – हिंदी चित्रपट ह्यभोसलेसाठी मनोज वाजपेयी आणि असुरन (तमिळ)साठी धनुष यांना संयुक्तपणे, बेस्ट मेल प्लेबॅक सिंगर – केसरी – तेरी मिट्टी , बेस्ट सपोटिर्ंग अँक्ट्रेस – पल्लवी जोशी (ताश्कंद फाईल्स चित्रपटासाठी), बेस्ट डायरेक्टर – बहत्तर हूरें चित्रपटासाठी संजय पूरण सिंग चौहान, स्पेशल मेन्शन – बिर्याणी, जोनाकी पोरुआ, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक – सावनी रवींद्र (बाडरे – रान पेटलं), लता भगवान करे, पिकासो, बेस्ट स्क्रीन प्ले (डॉयलॉग रायटर) – विवेक रंजन अग्निहोत्री, ताश्कंद चित्रपटासाठी ,बेस्ट चिल्ड्रन फिल्म – हिंदी फिल्म कस्तुरी
सुशांतसिंग राजपूतचा छिछोरे सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
Contents hide