• Sat. Sep 23rd, 2023

सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते एस.सुखदेव यांच्या पुण्यातिथीनिमित्त फिल्म डिव्हिजनकडून श्रध्दांजली

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021

मुंबई : सर्वोत्कृष्ट माहितीपट निर्माते एस.सुखदेव यांना त्यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चित्रपट निर्मितीतील महत्वपूर्ण योगदानाची आठवण करत फिल्म डिव्हिजन दिनांक 1 मार्च 2021 रोजी त्यांचे तीन चित्रपट प्रदर्शित करत आहे.फिल्म डिव्हिजन त्यांच्या संकेतस्थळावर आणि यू ट्यूब वाहिनीवर दिवसभर या चित्रपटांचे प्रसारण करणार आहे.
यात ‘’एक आकार ‘’ (21 मिनिटे /हिंदी/1985), खिलौनेवाला हा गुलजार यांनि दिग्दर्शित केलेला सुखदेव यांच्या वरील लघुचरीत्रपट (19 मिनिटे/हिंदी/1971), राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेवरील सुखदेव यांचा चित्रपट आणि ‘ द लास्ट अडियू’ (92मिनिटे/इंग्रजी/2013) हा शबनम सुखदेव या त्यांच्या मुलीने भूतकाळ उलगडण्याच्या वैयक्तिकपणे घेतलेल्या शोधावरील आणि स्वतःच्या वडील आणि मुलगी या नातेबंधावरील माहितीपटाचा समवेश आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!