• Thu. Sep 28th, 2023

सासुगीरी

ByGaurav Prakashan

Mar 23, 2021

“माझी सासू किती बोलली, आजही किती बोलणार” मुलाच्या तोंडचे वाक्य. मुलगा बापाला बोलत होता.आनंद त्याचं नाव होतं. आनंदाचा विवाह जुळला होता. त्यात आज त्याचा विवाहही पार पडला होता. सर्वत्र आनंदीआनंद होता. त्यातच या आनंदमय वातावरणात थोडी धावपळ झाल्यानं वडीलाची प्रकृती बरी नव्हती. त्यातच वडील दुस-याच्या घरी झोपून होता. त्याच्या वडीलांना वाटत होतं की थोडासा आराम होईल व आपल्याला बरे वाटेल.आनंदचा विवाह झाला खरा. पण विवाहाला आनंदरावाचे वडील काही गेले नाही. कारण दोनतीन दिवसापासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यातच ते घरी राहिले. मुलगा आनंद काही पाहूण्यासोबत परणू गेला. पण त्यातच घोडं आडवं गेल्यागत आनंदाची सासू ओरडून त्याचेवर दबाव टाकत म्हणाली,
“बाप कुठाय. इथं बापाचं काम असतांना आपण बापाला आणलं नाही.” सासू थोडीशी खास्टच होती. त्यातच सासू बाप न आल्यानं ओरडली खरी. पण त्याचे उत्तर आनंदानं काही बरोबर दिले नाही. प्रकृतीचं कारणंही सांगीतलं नाही. कारण त्याला भीती वाटत होती की सासू कोणतीही शहानिशा न करता मुलगी देणार नाही. त्याचं कारणंही तसंच होतं. कारण काळ बदलला होता. भ्रृणहत्येनं मुलींचे गर्भ मारले गेल्यानं मुलींची संख्या आज कमी झालेली होती. मुली काही आता मिळत नव्हत्या आणि ज्याला मिळाल्या, त्याला नशीबवान समजले जात होते. त्यातच आनंद साक्षगंधापासूनच सासूच्याच मतानं चालत होता.आज आनंद हा बाप न आल्यानं दुखावला होता. त्याला वाटत होतं की सासू बोलू नये. त्याला रागावू नये. सासूचा राग म्हणजे कुठंतरी मुलगी परत नेणे किंवा विवाह तोडणे होय. त्यातच समजा विवाह तोडलाच तर दाग लागून पुन्हा मुलगी मिळणार नाही. म्हणून की काय, आनंद सासूगीरी झेलत होता.
आज रिसेप्सन होतं. बापाच्या पोटात दुखत होतं. त्याला कळ येत होती. त्यातच तो शेजारच्या घरी अंथरुणावर लोटला होता. अशातच बाप मंडपात दिसला नाही. त्यामुळं की काय, आनंदचा पारा वाढला.
कालही बाप विवाहस्थळी नव्हता. आजही नव्हता, हे पाहून आनंदाच्या पारा वाढण्याला कारण झालं. त्यातच आनंदानं बापाची शोधाशोध घेतली. त्यातच शेजारच्या घरी बाप दिसला. तसा बाप दिसताक्षणी आनंद भडकला. तो बापाला म्हणाला,
“माझी सासू किती बोलली, आजही किती बोलणार.”सासूचे सासूगीरीतील ते शब्द. ते आनंदाच्या तोंडून निघत होते. त्यातच बापाला राग आला. तरीही त्यानं राग गिळला. पण शेजारच्यांचं काय, त्याला मात्र राग आला. तसा शेजारीच बोलला,
“कारे आनंदा, बापाला बोलतोस. ज्या माणसानं तुला जन्म दिला. लहानाचं मोठं केलं. आज विवाह जुळताच तू हे सगळं विसरलास. तुला माहित आहे का की सासूला घाबरायचं नसतं. आज विवाहापुर्वीच तू एवढा घाबरला, तर विवाहानंतर तुझं काय होणार.”आनंदानं ते शेजारच्यांचे शब्द ऐकले. त्याला सासूच्या सासूगीरीवरुन बापाचा आधीच भयंकर राग आला होता. पण आता शेजारच्या व्यक्तीच्या बोलण्यानं त्याच्या रागात अजून वाढ झाली व तो म्हणाला,”तुम्ही बोलू नका आणि माझ्या बापाला चढवू नका. तुम्ही चूप बसा.”
आनंदाचे ते शब्द शेजारच्या माणसानं ऐकले. त्याला वाईट वाटलं. तसा अवतार आनंदाचा अजूनपर्यंत शेजारच्यांनी पाहिला नव्हता वा कधीच त्याच्या तोंडून असे शब्द ऐकले नव्हते. तसा तो शेजारी दुःखावल्या गेला. त्यातच तो शेजारी बोलला,
“आपल्या सासूची सासूगीरी आपल्याजवळच ठेव. आम्हाला तुझ्या सासूचं काय करायचंय. तू असशील बैल बनलेला. बैलच बन. पण आम्हाला अपशब्द बोलू नकोस.आम्ही तुझं खपवून घेणार नाही.”
अलिकडे अशीच सासूगीरी वाढत चाललेली आहे. मुलग…….ज्याला मायबाप लहानाचं मोठं करतात. उन्हातून सावलीत नेतात. त्या मायबापाला विवाह होताच मुले दूर सारत आहेत. आपल्या सासू सास-यांनाच वर चढवीत आहेत. त्यातच कधीकधी मुले आपल्या मायबापाचं घर सोडून सासूसास-याच्या घरीही राहायला जात आहेत. कघीकधी तर चक्क मायबापांना पत्नी आणि सासूच्या बोलण्या वरुन वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकत आहेत. ती सासूबाई वरचढ झाली आहे. तर मुलाच्या मायबापाची इज्जत मुलीच्या पायाजवळ गेली आहे.ती सासूबाई आनंदा व शेजारी यांचे संवाद चाललेले होते. वेळ निघून जात होता. त्यातच आनंदा निघून गेला. मात्र त्याच्या कार्यक्रमात तो शेजारी गेला नाही. त्याला भयंकर राग आला होता. हे सर्व सासूगीरीनं घडलं होतं. पुढं आनंदा सासूजवळंच राहायला गेला. मायबाप मात्र एकटे राहात होते. त्यातच पुढं मायबाप मरण पावले. ते पुष्कळ सारी मालमत्ता सोडून गेले. आता मात्र सासूच्या घरी राहणारा व्यक्ती आनंदा मायबापाच्या मालमत्तेवर राज करु लागला आणि मायबापाची सेवा न करणारा आनंदा आपल्या मुलांना गर्वानं सांगू लागला मायबाप व सासूसासरे देव असतात. त्यांची सेवा करायला हवी.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    अंकुश शिंगाडे,

    नागपूर
    ९३७३३५९४५०

(Image Credit : YouTube)