• Wed. Jun 7th, 2023

सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, ४४६ नवीन पॉझिटिव्ह

ByGaurav Prakashan

Mar 8, 2021

अमरावती : जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार रविवार, ७ मार्च रोजी जिल्ह्यात ४४६ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२६ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला असून, ६ हजार ६६३ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. ३२ हजार २९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे.
जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना प्रशासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेऊन काही प्रमाणात शिथिलता आणून निर्बंध कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असताना जिल्ह्यात कोरोना अनियंत्रित होता आता मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे कोरोना रुग्णांची सख्या वाढू शकते. याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांचा आकडा हा नियंत्रणाबाहेर गेल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न देखिल अनेक नागरिक उपस्थित करताना दिसून येत आहे. जिल्ह्यात अद्यापही कोरोनावर पूर्णपणे अंकुश लावण्यात आला नसताना नागरिकांना वावरण्यासाठी देण्यात येणारी सूट ही कोरोनाला अनुकुल ठरू शकते हे सध्याच्या परीस्थितीवरून दिसून येत आहे. बाजारपेठा, समारंभ तसेच इतर भेटीगाठींच्या माध्यमातून कोरोनाचा होणारा प्रसार हा अमरावतीकरांसाठी घातकच ठरणार, हे मात्र नक्की. ७ मार्च रोजी आरोग्य विभागाकडुन प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने ४४६ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून, जिल्ह्यात आतापर्यंत ३९ हजार ५२४ रुग्णांना कोरोनाची लागन झाली आहे. ३२ हजार २९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, ६ हजार ६६३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५६२ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *