- माय माझी तू माऊली
- तुझी आहे ग सावली
- लेखणीच्या तू रूपात
- जगताला तू पावली
- अंधाच्या युग नगरीत
- उजेडाची तू पेरणी
- नवदिशा जागृतीच्या
- करता हसे धरणी
- किती सेवा केली साऊ
- प्लेगच्या साथीत तू ग
- माय झाली दुखीताची
- बलीदान दिले तू ग
- चुलीतल्या धुपटाची
- काहीणी होती बाई
- फुलावाणी सजवलं
- स्वप्न दिले हाती आई
- आकाशाची गवसनी
- देत दिला खरा अर्थ
- शिक्षणाने स्त्रिला मिळे
- तुझ्या रुपात सामर्थ्य
- खरे जगणे आज आले
- स्वाभिमान तो जागला
- पशुत्व गेले त्याचेच
- माणसावाणी वागला
- शेण ,विटा माती घाण
- फेके दुष्ट तुझ्यावर
- मागे नाही तू हटली
- दुष्ट झाले अनावर
- घाबरू नको सावित्री
- ओव्या ग तुझ्या होतील
- साकार झाले स्वप्न ते
- आकाशी दीप जाईल
- परिचारिका होऊन
- दायी झाली नर्स झाली
- अनाथाची माता होता
- विधवाची माय झाली
- केस कर्तनाचा संप
- यशस्वी तूच केला ना
- पहिली शिक्षीका जगी
- तुझाच मान होता ना
- सत्य शोधत गेली तू
- अंखड ध्यास चाहूल
- जोतीच्या संगती तुझे
- सदा पडते पाऊल
- विनम्र होऊन तुला
- अभिवादन करते
- स्विकार कर आई तू
- तुझीच आस धरते
- शब्द सुमनाची वाहते
- श्रध्दाजंली आसवांची
- ज्ञानाची ज्योत प्रसव
- हीच आशा सुनीतेची
Contents hide
- सुनीता इंगळे,
- मुर्तीजापूर