नवी दिल्ली:देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 47,239 रुग्ण आढळले, 23,913 बरे झाले आणि 277 जणांचा मृत्यू झाला. नवीन रुग्ण 40 हजारांपेक्षा जास्त आढळण्याचा हा सलग पाचवा दिवस होता. मृताांचा आकडाही या वर्षी सर्वात जास्त आहे. दरम्यान केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर घातलेली बंदी 30 एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
देशात आतापर्यंत 1 कोटी 17 लाख 33 हजार 594 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 12 लाख 3 हजार 16 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.60 लाख जणांनी जीव गमावला आहे. तर 3.65 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेण्यात आले आहेत.
तर महाराष्ट्रामध्ये मंगळवारी 28,699 नवीन रुग्ण आढळले. 13,165 बरे झाले. तर 132 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 25.33 लाख लोक हे कोरोना संक्रमित झाले आहेत. यामधून 22.47 लाख बरे झाले आहेत. तर 53,589 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे सोमवारच्या तुलनेत पुन्हा एकदा रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी 24,645 रुग्ण समोर आले होते. जे मंगळवारी वाढून 28,699 झाले.
सलग पाचव्या दिवशी 40 हजारांपेक्षा जास्त संक्रमित आढळले
Contents hide