अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचेवतीने कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृति प्रित्यर्थ दिल्या जाणारा श्री संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार यासाठी यावर्षी घोषित झालेले समाजसेवक विवेक वासुदेवराव चर्जन रा. बासलापूर ता. चांदुररेल्वे जि. अमरावती यांना दि. २७ मार्च २0२१रोजी दु. १ वाजता ससन्मान प्रदान केल्या जाणार आहे. शॉल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तसेच रुपये दहा हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कर्मयोगी श्री संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार सामाजिक कार्य करणार्या व्यक्ती वा संस्थेला हा पुरस्कार देवून दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
Contents hide