यवतमाळ – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या शिष्यवृत्ती / शिक्षण फी परीक्षा फी योजनेचे शैक्षणिक वर्ष सन २0१९ व २0२0-२१ मधील शिष्यवृत्तीचे / फ्रीशिपचे प्रलंबित अर्ज विद्यार्थीस्तर, महाविद्यालय स्तरावरील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवगार्चे विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे महाडीबीटी प्रणालीवरील प्रलंबित अर्ज तात्काळ तपासून व मंजूर करून ऑनलाईन दिनांक २३ मार्च २0२१ च्या पूर्वी या कार्यालयास सादर करावे. अन्यथा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या, फ्रीशिपच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, याची नोंद घ्यावी, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण यांनी कळविले आहे.
Contents hide