अहमदाबाद : टीम इंडिया क्रिकेटच्या सर्वात मोठय़ा प्रारुपात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर आता टी-२0 मालिकेसाठी तयार आहे. कसोटी मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर आता विराट सेनेचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ते विजयी लय टी-२0 मालिकेतही कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील. भारतात यावर्षी ऑक्टोंबरमध्ये टी-२0 विश्वचषकाचे आयोजन होणार आहे, अशात टीम इंडिया शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या टी-२0 मालिकेचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करेल.
विराट आणि संघ व्यवस्थापन या गोष्टीवर जोर देतील की या मालिकेतून ते आपल्या राखीव खेळाडूंना तयार करण्याचा प्रयत्न करतील. तर अशाच प्रकारची योजना जगातिल नंबर टी-२0 संघ इंग्लंडचाही असणार आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनेही म्हटले आहे की भारतात होणार्या टी-२0 विश्वचषकाआधी ही मालिका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सिद्ध होईल. जागातिल दोन सर्वात शक्तीशाली संघात रोमहर्षक सामना होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा विचार केल्यास त्यांच्याकडे अनेक पर्याय आहे ही कर्णधारासाठी चांगली गोष्ट आहे परंतु डोकेदुखीही आहे. टीम इंडियाला जास्त प्रयोग टाळावे लागतील व पर्याय तसेच राखीव खेळाडूंनाही बघावे लागेल.
जुना अनुभव बघता कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आता निर्णय करतील की टी-२0 विश्वचषकात रोहितसोबत कोण डावाची सुरुवात करेल. त्यांच्याकडे लोकेश राहुल व शिखर धवनच्या रुपात दोन पर्याय आहे. र्मयादित षटकांच्या अंतिम संघात राहुलची निवड जवळपास निश्चित आहे परंतु आंतरराष्ट्रीय सामन्यात धवनचे प्रदर्शन नेहमीच शानदार झाले आहे आणि तो संघाचा अनुभवी खेळाडू आहे. कोहलीने जर धवनला संधी दिली तर राहुल चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. हा कठीण निर्णय विराटला करायला आहे कारण हे दोघेही खेळले तर श्रेयस अय्यर किंवा अनेक वर्षांपासून पर्शिम करून संघात स्थान मिळवणार्या सूर्यकुमार यादवला बाहेर बसावे लागेल. श्रेयस व सुर्यकुमार चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाजी करतात संघ व्यवस्थापन याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.
विश्वचषकाआधी ‘बेस्ट’ची ‘टेस्ट’
Contents hide