पुणे :विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये तिसर्या क्रमांकावर फलंदाजीला येत १0 हजार धावांचा टप्पा पार केला. या क्रमांकावर फलंदाजीला येत १0 हजार धावा करणारा तो जगातील फक्त दुसरा फलंदाज आहे. विराट कोहलीच्या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने क्रमांक तीनवर येत अशी कामगिरी केली होती. पॉन्टिंगने वनडेत तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना १२ हजार ६६२ धावा केल्या आहे. याबाबत विराटने कुमार संगकारा, जॅक कॉलिस, केन विलियमसन यांना मागे टाकले. संगकाराने तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करत २३८ डावात ९ हजार ७४७ धावा केल्या. कॅलिसने २00 डावात ७ हजार ७७४ तर विलियमसनने ११७ डावात ५ हजार ४२१ धावा केल्या आहेत. इतक नाही तर विराट कोहलीने तिसर्या क्रमांकावर सर्वात वेगाने १0 हजार धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला.
गेल्या वनडेत विराटने भारतीय मैदानावर सर्वात कमी डावात १0 हजार धावांचा टप्पा गाठला होता. रिकी पॉन्टिंगने २१९ डावात घरच्या मैदानावर १0 हजार धावा केल्या होत्या. विराटने २१९ डावात हा टप्पा पार केला. दुसर्या वनडेत शिखर धवन ४ धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा देखील २६ धावा करून माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी तिसर्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. विराट कोहली ६६ धावांवर बाद झाला.
विराट कोहलीची धमाकेदार कामगिरी
Contents hide