मुंबई : लॉकडाउन हा अगदी शेवटचा पर्याय असतो. लॉकडाउन कोणालाच नको असतो. पण राज्य सरकारकडे आयसीयू बेडस, डॉक्टर्स आदी संसाधनांची उपलब्धता लक्षात घ्यावी लागते. रुग्णांची संख्या जर वाढत गेली आणि बेडस आदी कमी पडायला लागले तर लॉकडाउनच्या नको असणार्या पर्यायाचा विचार करावा लागतो. अर्थातच लॉकडाउनचा निर्णय काही एका दिवसात घेण्यात येत नसतो. त्याचा अभ्यास करण्यात येतो. उद्योग क्षेत्र, बांधकाम क्षेत्र आदी मोठ्या प्रमाणात रोजगार देणार्या क्षेत्रांना अडचण होणार नाही याचाही विचार करण्यात येत असतो, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जनतेनेही नियम पाळून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. नियम पाळा, लॉकडाउन टाळा, असा साधा सोपा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सात्यत्याने वाढत चालली आहे. लॉकडाउन होणार या भीतीने जनतेला ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
लॉकडाउन हा शेवटचा पर्याय
Contents hide