अमरावती: देशातील प्रमाणित खासगी रूग्णालयांत कोरोना प्रतिबंधक लस अडीचशे रुपयांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील आठ रूग्णालयांनी तयारी दर्शवली आहे. लवकरच यासंदर्भात इतरही रूग्णालयांचे प्रस्ताव पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी दिली.
बेस्ट हॉस्पिटल, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, हाय टेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, सुजन सर्जिकल कॅन्सर हॉस्पिटल, संकल्प चौधरी मॅटर्निटी हॉस्पिटल, मातृछाया हॉस्पिटल, आरोग्यम इन्स्टिट्यूट, धारणीतील उतावळी येथील सुशीला नायर रूग्णालय या रूग्णालयांचा प्रस्ताव देणा-या रूग्णालयांत समावेश आहे.
कोरोना लसीकरण मोहिमेत सुरवातीला डॉक्टर, पोलीस, पारिचारिका आदी फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण होत आहे. आता नंतरच्या टप्प्यालाही आता सुरुवात होत असून, त्याद्वारे ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी कोविन ॲपवर त्यासाठी नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे, सेतू केंद्रावरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांची अचूक माहिती प्राप्त होऊन लसीकरण गतीने व्हावे, यासाठी आशा स्वयंसेविकांकडून माहिती संकलन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी आज सांगितले.
लसीकरणासाठी 8 खासगी रुग्णालयांनी तयारी दर्शवली- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम
Contents hide