अमरावती : अमरावती महानगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, मनपा आयुक्त यांचे स्विय सहाय्यक चेतन मेर्शाम व माजी अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे यांनी आज लसीचा दुसरा डोस दंत महाविद्यालय येथे घेतला. यावेळी लसीकरण सत्र केंद्र प्रमुख डॉ.स्वाती कोवे, प्रिया वाघमारे, स्नेहल डोंगरे, संजना इंगोले, दिपाली भुसकट उपस्थित होत्या.पहिल्या टप्प्यात कोरोना प्रतिबंधासाठी काम करणार्या फ्रंटलाईन वर्कर्सना ही लस दिली जात आहे. पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनंतर दुसरा डोस दिला जातो. महानगरपालिका क्षेत्रात १६ जानेवारीला या मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यानंतर लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला. लसीकरण झालेल्या व्यक्तींना दुसरा डोस देण्यात येत आहे. अनेक डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन लसींचा लसीकरणात समावेश आहे. लसीकरणाचा दुसरा डोसही प्राप्त झाल्याने शरारीत सक्षम प्रतिकारशक्ती यंत्रणा निर्माण होऊन कोरोनावर मात करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे. ही लस सुरक्षित आहे. पहिल्या डोस घेतलेल्या सर्व फ्रंट लाईन वर्करनी तातडीने ही लस घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी केले.
लसीकरणाचा दुसरा डोज देण्याची प्रक्रिया सुरू
Contents hide