• Sat. Jun 3rd, 2023

लढा देऊ अन्यायाला…

ByGaurav Prakashan

Mar 1, 2021
  रंग सावळा सावळा
  मन परंतु निर्मळ ।
  जननीच्या संस्काराने
  नष्ट झाली मरगळ ।।
  भारतीय बंधू सारे
  मजसाठी प्रिय फार ।
  जाती धर्मांच्या बेडीला
  नाही करत स्वीकार ।।
  मान्य नाही मज नारी
  आहे अबला म्हणून ।
  चालविते सृष्टी तीच
  जीव जन्माला घालून ।।
  मज पामरास काय
  सांगा कळणार ज्ञान ।
  फक्त जाणतो साऱ्यांना
  नित्य आपल्या समान ।।
  रंगभेद,धर्मभेद
  प्रांतवाद,भाषावाद ।
  याचमुळे देश माझा
  होणे आहे बरबाद ।।
  किती महंत जन्मले
  किती जन्मणार पुन्हा ।
  तरी आपल्या हाताने
  रोज घडणार गुन्हा ।।
  जरा आठवा वीरांना
  त्यांचे कार्य किती थोर ।
  त्यांनी कुठे आणीयले
  जाती धर्मांना समोर? ।।
  एक होऊ त्यांच्यासम
  लढा देऊ अन्यायाला ।
  प्रेम करणे शिकवू
  सारे मिळून जगाला ।।
  शब्दसखा

  -अजय रमेश चव्हाण,

  तरनोळी,ता.दारव्हा,जि.यवतमाळ
  मो.८८०५८३६२०७

(Image Credit : Bookganga)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *