राष्ट्रव्यापी मातृभूमी भेदभाव निर्मूलन समितीचे निवेदन

दारव्हा : राष्ट्रव्यापी मातृभुमी भेदभाव निर्मूलन समितीने केंद्र शासनाच्या कृषी मुल्य आयोगाकडे सोयाबीनची अँनाकॉन लेबोरेटरी नागपूर यांचेकडे पोषक द्रव्य तपासणीसाठी दि.२४ डिसेंबर २0२0 रोजी १00 ग्रॅम सँपल पाठविले असता लॅबोरेटरीकडून १00 ग्रॅम सोयाबीनमध्ये ३९% प्रोटीन असल्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला. सोयाबीन मध्ये प्रति किलो ३९0 ग्रॅम प्रोटीन असताना प्रोटीन या पोषकद्रव्याची मेडिकल स्टोअर आणि औषधी दुकानात प्रती किलो किंमत ४ ते ५ हजार रुपये किलो असताना सोयाबीनचे हमी भाव (टरढ) ही ४३00 रु. क्विंटल कशी काय जाहीर करण्यात येते.
या कारणास्तव राष्ट्रव्यापी मातृभूमी भेदभाव निर्मूलन समितीने सोयाबीनची प्रयोगशालेय तपासणीचा दि.३१ डिसेंबर २0२0 चा अहवाल जोडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाकडे दि.२४ मार्च २0२१ रोजी प्रोटीनच्या चालू बाजार भाव किमतीनुसार सोयाबीनची ट.र.ढ. हमी भाव जाहीर करण्यात यावे या मागणीसाठी निवेदन पाठविले आणि राष्ट्रीय कृषीमूल्य आयोगाने दरवर्षी कुठल्याही पिकांची किमान आधारभूत किंमत (ट.र.ढ.) मोघमपणे जाहीर न करता सगळ्या पिकांची पोषकद्रव्ये चाचणी करून त्यातील पोषकद्रव्ये, जिवनसत्वे यांची चालू बाजार मूल्य ग्राह्य मानून हमी भाव निश्‍चित करण्याची मागणी समीतीचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव राठोड, उत्तमराव राठोड, जानुसिंग राठोड ज्ञानेश्‍वर दुधे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!