मुंबई : राज्यातील सरकारी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकार शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी कटिबद्ध आहे. ५00 आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन दिला गेला असला. तर विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय महत्वाचा म्हणावा लागेल. शासकीय शाळांच्या गुणवत्तेत सुधारणा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ५00 आदर्श शाळा स्थापित करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडेल,यासाठी शाळांत नियमित शिक्षणाव्यतिरिक्त मानसिक,शारीरिक आणि बौद्धिक विकास होईल असे शिक्षण दिले जाईल, असे ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
आदर्श शाळांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, आदर्श शिक्षक-विद्यार्थी संख्येनुसार सोयीसुविधांचा वापर, निकाल आणि परिणामांवर भर दिला जाईल, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.
शासन निर्णय काय आहे?
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या ८१ शाळा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, शासकीय विद्यानिकेतने व नागरी भागातील शाळा यांचा समावेश करुन प्रथम टप्प्यात सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे ४८८ शाळा आदर्श म्हणून विकसित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
राज्यात ५00 आदर्श शाळा स्थापित करणार
Contents hide