• Wed. Jun 7th, 2023

राज्यातील रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून द्या

ByGaurav Prakashan

Mar 8, 2021

मोर्शी : आमदार देवेंद्र भुयार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरवविन्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी विधानसभेत ५७ अन्वये चर्चा केली.
राज्यातील गोर गरीब रुग्णांच्या दुर्धर आजारावर उपचार करता यावेत, यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष उभारण्यात आले. मात्र, पैशाअभावी गरिबांना उपचार करण्यासाठी मदत मिळत नाही, आजही राज्यातील हजारो रुग्ण उपचार करण्यासाठी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य व्यक्तीला आजारावर उपचार घेता यावेत, त्याच्यावर शस्त्रक्रिया, औषधो पचारासाठी सरकारकडून मदत मिळावी या हेतूने मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष नावाचे पवित्र मंदिर सुरू करून गोर गरीब रुग्णांना मोठय़ाप्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना दिलासा मिळवून देण्यासाठी त्यावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
आजही रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मुंबईत मंत्रालयाचे खेटे खाण्याची वेळ येऊ नये म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्याची मागणी यावेळी केली. आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. मागील सरकारने यासाठी उपराजधानीतील मुख्यमंत्री सचिवालयात विशेष कक्ष सुरू केले होते.
त्यानंतर हे कक्ष बंद करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आमदार देवेंद्र भुयार यांनी कक्ष सुरू करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावी या योजनेसाठी विदभार्तीलच नव्हेतर राज्यातील इतर कुठल्याही भागातील लोकांना मुंबई मंत्रालयात मदतीसाठी यावे लागू नये, यासाठी त्यांच्या जिल्ह्याच्या मुख्यालयातच या निधीसाठी प्रस्ताव सादर करता यावा म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष उभारण्यात आला असून, तेथेच तत्काळ मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा व ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अधिवेशनामध्ये केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *