मुंबई : फक्त उन्हाळ्यातच चोरी करणार्या एका हंगामी चोराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असणारा हा चोर उन्हाळ्यातील तीन महिने चोरी करण्यासाठी मुंबईत यायचा. गेल्या १३ वर्षांपासून हंगामी चोरीचा त्याचा हा ‘उद्योग’ सुरू होता. एका चोरी प्रकरणाचा छडा लावताना दादर लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून चौकशीदरम्यान त्याच्या चोरीची ही अनोखी स्टाईल समोर आली आहे. सध्या त्याच्या हंगामी चोरीविषयीच जास्त चर्चा होताना दिसत आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च २0२१ रोजी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पहाटे प्रवास करणार्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून एक चोरटा पळून गेला. याबद्दची तक्रार संबंधित महिलेने पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांकडून दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असतात. एक अज्ञात चोर महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून फलाटावर उडी मारून पळून गेल्याचे यात दिसून आले. यानंतर पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यावरून अज्ञात चोराचा माग काढत पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
यूपीतला चोर, फक्त उन्हाळय़ात करायचा चोरी
Contents hide