अमरावती : माणुस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे माणसाच्या जीवनाचा प्रत्येक क्षण तो आपल्या लोकांमध्ये वावरत घालवित असतो. या जीवनात काही तरी दुसऱ्यांसाठी करण्याची प्रत्येकाची ईच्छा असते. काही लोक आपल्या ईच्छा पूर्ण करीत गरजुंची मदत देखील करीत असतात. परंतू समाजात असेही काही लोक आहेत. जे आपल्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात आनंद मानतात. आजकालचा युवक या कार्यात नेहमी अग्रेसर राहत असल्याचे दिसुन येते. अशाच यश देशमुख नामक युवकाने स्वत: वाढदिवस मित्र मंडळीत साजरा न करता लहान-लहान बालकांबरोबर साजरा करीत त्याच्या चेहऱ्यावर हसू आणले.
आपल्या जीवनाचा महत्त्वपुर्ण दिवस म्हणजे अर्थातच वाढदिवस. हा दिवस सामाजिक कार्यासोबत साजरा करीत घिलमछावणी परिसरातील सदाशांती बालगृहाच्या अनाथ बालकांच्या चेहऱ्यावर यश देशमुख यांनी आनंदांचे खळखळणारे हास्य आणले. यश मित्र परिवाराच्या वतीने सदाशांती बालगृहातील बालकांसाठी यावेळी खाऊ आणण्यात आला. याशिवाय परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. अनाथ बालकांच्या सानिध्यात साजरा करण्यात आलेला हा विशेष आठवणीतील वाढदिवस असल्याचे यावेळी यश देशमुख म्हणाले.
यश मित्र परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आविष्कार गावंडे, तेजर गोतारकर, सार्थक चिखलकर सोबत इतरही मित्र मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्वानी यशला भरभरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यश देशमुख ने बालकांसोबत साजरा केला वाढदिवस सदाशांती बालगृहामध्ये यश मित्र परिवाराचे आयोजन
Contents hide