यवतमाळ : गत २४ तासांत जिलत चार मृत्यूसह १५१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २१२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये पुसद येथील ५५ वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ६0 वर्षीय महिला आणि चांदूर रेल्वे येथील ५८ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच पॉजिटिव आलेल्या १५१ जणांमध्ये ९५ पुरुष आणि ५६ महिला आहेत. यात यवतमाळातील ५८ रुग्ण, पुसद येथील ३४, पांढरकवडा १३, महागाव १२, नेर ८, दिग्रस ७, कळंब ३, आर्णी २, बाभुळगाव २, दारव्हा २, घाटंजी २, राळेगाव १, वणी १, उमरखेड. १, झरीजामणी १ आणि ४ इतर शहरातील रुग्ण आहेत.
यवतमाळात चौघांचा मृत्यू, १५१पॉझिटिव्ह
Contents hide