• Wed. Jun 7th, 2023

मुलीसोबत दुष्कृत्य करणार्‍या बापास जन्मठेप

ByGaurav Prakashan

Mar 12, 2021

वर्धा : स्वतच्या मुलीवर दुष्कृत्य करणार्‍या नराधम बापास बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ६ नुसार जन्मठेप व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सर्शम कारावास तसेच भादंविच्या कलम ५0६ अन्वये एक वर्ष सर्शम कारावास व ५00 रूपये दंड , दंड न भरल्यास एक महिन्याचा सर्शम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल विशेष जिल्हा न्यायाधीश-१ सूर्यवंशी यांनी दिला.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी हा पत्नी पीडित पत्नी , पीडित मुलगी व मुलासह राहत होता. त्याने घरी कुणी नसल्याचे पाहून पीडितेवर बळजबरी बलात्कार केला. आरोपी इतक्यावर थांबला नाही तर तो पीडितेने शारीरिक सुखासाठी नकार दिल्यावर मारहाणची करायचा. पीडितेचा सहनशक्तीचा बांध फुटल्यावर तिने आईला घटनेची माहिती दिली. हा धक्कादायक प्रकार पीडितेच्या आईने पीडिताचे मामा, आत्या, मोठी आई व आजी यांना दिल्यावर आरोपीने पीडिताच्या आईलाही मारहाण केली. सदर प्रकार गंभीर असल्याने अखेर सावंगी मेघे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी तपासाअंती प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. या प्रकरणात सहा साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद व पुरावे लक्षात घेत न्या.सूर्यवंशी यांनी वरील शिक्षा सुनावली. शासकीय बाजू अँड. विनय घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी भारती कारंडे यांनी काम पाहिले.

(Image Credit : TV9 Marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *