• Wed. Jun 7th, 2023

मुलाखतीत यश मिळवायचे तर..

ByGaurav Prakashan

Mar 5, 2021

नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नातली पहिली पायरी म्हणजे मुलाखतीला सामोरं जाणं. मुलाखतीत ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्वाचीही छाप पडते. म्हणूनच इंटरव्हयूला जाताना आपल्या लूककडे विशेष लक्ष द्यायला हवं. यादृष्टीने इंटरव्हूला जाताना नेमकं काय करता येईल याविषयी जाणून घेऊ या.
चुकीच्या फिटिंगचे कपडे घालू नका. फार घट्ट किंवा ढगळ कपडे घालू नका. इंटरव्हयूला जाताना भलतंसलतं काहीही घालू नका. असा पेहराव असेल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत. बो टाय, बेडॅझल्ड तसंच मेटॅलिक टाय, पेस्टल किंवा निळ्या रंगाचे सूट असलं काहीही घालू नका. चांगली पँट सापडली नाही तर मुलं पटकन जीन्स निवडतात. त्यातही फॉर्मल पँटसारखी वाटणारी ब्लॅक जीन्स घातली जाते. पण असं करू नका. जीन्स हा कॅज्युअल पेहराव आहे. इंटरव्ह्यूला जीन्स घालून जाणं ही खूप मोठी चूक ठरेल. सँडल्स किंवा स्नकर्सही घालू नका. टॅटू काढले असतील तर ते झाकणारे कपडे घाला. पिअर्सिंग केलं असेल तर तेही लपवा. इंटरव्ह्यू घेणार्‍याचे विचार, दृष्टकोन आपल्याला माहीत नसतो. त्याला हे सगळं विचित्र वाटू शकतं. त्यामुळे साधा फॉर्मल लूक ठेवणं योग्य ठरतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *