मुंबई : मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. औरंगाबादमध्ये आठवडाभराचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर, अनेक जिल्हय़ात लॉकडाऊनचा विचार स्थानिक प्रशासन करत आहे. मुंबईतही अंशत: लॉकडाऊन केले जाऊ शकते, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
विधान भवनाच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली आहे. गरजेनुसार प्रशासनाने र्मयादित लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असे शेख यांनी सांगितले. मुंबईत देखील रुग्ण वाढत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला बर्याच प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही बेफिकीरी दिसून येत आहे. मुंबईत तीन ते चार नाइट क्लबवर कारवाई झाली आहे. रुग्णसंख्या वाढत राहिल्यास सर्वात प्रथम मुंबईतील नाइट क्लब बंद केले जातील. त्यानंतरही रुग्ण वाढत राहिल्यास नाइट कफ्यरू किंवा अंशत: लॉकडाऊनची शक्यता नाकारता येत नाही, असेही शेख यांनी सांगितले. मास्क न घालणार्या नागरिकांना दंड केला जात आहे. मात्र, बेफिकिरी वाढत राहिल्यास समुद्र किनारे व गेटवे सारखी गर्दीची ठिकाणे बंद करावी लागतील. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही अस्लम शेख यांनी केले.
मुंबईत पुन्हा लॉकडाऊनची शक्यता.!
Contents hide