• Sat. Jun 3rd, 2023

मी म्हणाले होते, मी देशभक्त आहे, हरामखोर नाही – कंगना

ByGaurav Prakashan

Mar 22, 2021

मुंबई : राज्यातील वरीष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळं गृहमंत्री अनिल देशमुख हे अडचणीत सापडले आहेत. दर महिन्याला १00 कोटी जमा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सीआययूचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना दिले होते. त्यातले ४0 ते ५0 कोटी रुपये मुंबईतल्या १७५0 बार आणि रेस्टॉरंट्समधून गोळा होऊ शकतात, असं देखील गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना सांगितले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. दरम्यान या पत्रावरुन अभिनेत्री कंगना रणौत हिनं पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मी म्हणाले होते हे सरकार भ्रष्टाचारी आहे अन मी देशभक्त असा टोला तिने लगावला आहे. येत्या काळात हे भ्रष्टाचारी महाराष्ट्र सरकार पूर्णपणे एक्सपोज होईल. मी केलेला दावा अखेर सिद्ध झाला आहे. माझ्या शरीरात राजपुतांचं रक्त आहे. मी आणि माझं कुटुंब या भूमीवर प्रचंड प्रेम करतो. मी हरामखोर नाही खरी देशभक्त आहे.
जेव्हा मी महाराष्ट्र सरकारविरोधात आवाज उठवला तेव्हा मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. माझ्यावर टीका झाली. पण जेव्हा मी माज्या शहरासाठी आवाज उठवला तेव्हा त्यांनी माझे घर तोडले. तेव्हा अनेक लोकांनी आनंद साजरा केला होता. पण आता त्यांच्या खेळ दिर्घकाळ चालणार नाही., अशा आशायाची दोन ट्विट्स करुन कंगनानं राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. तिची ही ट्विट्स सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *