यवतमाळ : वणी रेल्वे स्थानकावरून कोळसा भरलेली रेल्वे नांदेडकडे जात असताना कायर गावाजवळील बाबापूर फाट्याजवळ गाडीचे १२ डब्बे रुळावरून खाली घसरल्याची घटना घडली आहे. वणी परिसरात मोठय़ा प्रमाणात कोळसा खाणी आहेत. या खाणीतून उत्खनन झालेला कोळसा विद्युत व अन्य उद्योगांकरिता वापरला जातो. त्यामुळे संपूर्ण देशभरात वणी रेल्वे सायडिंगवरून मालगाडीच्या माध्यमातून कोळसा वितरित केल्या जातो. वणी येथे ब्रिटिश काळापासून रेल्वे स्थानक आहे. आज सोमवारी १ मार्चला कोळसा भरलेली मालगाडी नांदेडच्या दिशेने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास निघाली होती. कायर गावाजवळील बाबापूर फाट्याजवळ मालगाडीच्या १२ डबे रेल्वे रुळावरून घसरले. या घटनेमुळे परिसरात चांगलीच तारांबळ उडाली होती. याची माहिती रेल्वे प्रशासनाला देण्यात आली असून वृत्त लिहेपयर्ंत रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा नि:स्वास घेतला. गाडीतील कोळसा इतरत्र पसरल्याने बाबापूर मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. हा अपघात नेमका कसा घडला याची माहिती वृत्त लिहिपयर्ंत मिळू शकली नाही.
मालगाडीचे बारा डब्बे रुळावरून घसरले
Contents hide