एकविसाव्या शतकात आज स्त्रियांनी गगनभरारी घेतली आहे, प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली छाप सोडली असून समस्त स्त्री जणांना “चूल आणि मूल या बेळ्यांपासून” मुक्त केले आहे आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडणारी ही स्त्री पत्रकारिता क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर समजा पहाड डोक्यावर घेऊन चालणे इतके आव्हानात्मक काम सुरवातीच्या काळात स्त्रिया मात्र या क्षेत्रात यायला घाबरायच्या या क्षेत्रात पाऊल कसा टाकायचा हा विचार करायच्या, परंतु आज बदलत्या काळा नुसार परिस्थिती बदललेली दिसतेय आता मुली या क्षेत्राकडे मोठ्या हौसेने वळू लागल्या आहेत तर समाज आणि आपल्या स्वयं हक्कासाठी धारधार तलवारीप्रमाने असलेली आपली लेखणी घेऊन लढत आहे,आणि पत्रकारिता क्षेत्रात निर्भीडपणे आपलं भविष्य घडवून आणत आहे. तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये ज्या स्त्री ला पत्रकारितेची जननी अर्थात पहिली महिला पत्रकार ज्यांनी आपलं योगदान पत्रकारिता क्षेत्रामध्ये दिल आहे अस नामवंत नाव ज्याने संपूर्ण जगाला शिकवण करून दिले ते असच एक नाव म्हणजे होमाई व्यारावाला यांनी होय,ज्यांनी छायाचित्र पत्रकारितेमधून १९३० साली आपल्या कामाची सुरवात केली. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक स्त्रियांनी पत्रकारिता क्षेत्रात आपलं अस्थित्व निर्माण करून इतीहासात आपलं नाव नोंदवलं आहे. असा महान कर्तृत्वान महिला आपल्या देशात होऊन गेल्या त्यांच्या बदल लिहिण्याचं कारण म्हणजे एवढाच कि आपण प्रत्येक ८ मार्च ला महिला दिवस साजरा करतो आणि अनेक समाज सेवी महिलांना गौरविण्यात येतं व कुठेतरी सगळ्यांना गौरवण्यात आपण आपल्या क्षेत्रातील महान अश्या कर्तृत्वान महिलांना विसरतो आणि त्याच अनुषगांने आपण महिला दिवस साजरा करत असताना माध्यम क्षेत्रातील स्त्रियांना का बरं विसरतो? हाच प्रश्न मनात पडलेला असताना माझा एक छोटासा प्रयत्न या दिनानिमित्त येवढाच कि त्यांचं पण फार मोठं योगदान आहे. देशासाठी,समाजाप्रती,म्हणून यांचा सन्मान व्हायला पाहिजे .
आजही आपण पाहतो कि स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांधा लावून आज कोणत्याही क्षेत्रात मांगे न राहता आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. अशाच ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपली कामगिरी केली आहे अश्या विरांगणाच्या बद्दल आपण जाणून घेऊ. ज्यांनी पत्रकारिता मध्ये आपली सुरवात केली होमी १९३० पासून त्या छायाचित्र पत्रकारिता करत, गुजरात वरून दिल्ली पर्यंतचा प्रवास केला व त्यांनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनामध्ये सहभाग घेऊन महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू,व मुहम्मद अली जिन्हा , याच्या कार्याची दखल घेत फोटो प्रकाशित केले होते. बॉम्बे क्रॉनिकल ,इलेस्ट्रेटिड वीकली ऑफ इंडिया, त्यांनी वृत्तपत्र व मॅगझीन मध्ये हि कार्य केले आहे.
तर नुकताच OTT प्लॅटफॉर्म वरील प्रदर्शित झालेला स्कॅम १९९२ हा वेबसिरीज आपण पाहिली ज्यात पत्रकार म्हणून ज्या बाईला दाखवले तीच बाई म्हणजे सूचीता दलाल यांनी १९९२ चा हर्षद मेहता यांचा घोटाळा हे प्रकरण समोर आणून देशाच्या हिताचे काम केले होते त्याबद्दल त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्या वेळी या विरांगणेने केलेली धाडसी पत्रकारिता आज त्यांचा आदर्श घेऊन अनेक महिला पत्रकारीता क्षेत्रा मध्ये आपली कामगिरी करताना दिसत आहे. गौरी लँकेश या सुद्धा क्रांतिकारी पत्रकार होत्या त्यांनी सुद्धा आपली पत्रकारिता निर्भीडपणे, प्रामाणिकपणे केली, मोडेल पण वाकणार नाही अशी डरकाळी देत,५ सप्टेंबर २०१७ मध्ये बँगलोर मध्ये मृत्यूला सामोरे गेल्या. अशा अनेक विरंगनानी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल काम न डगमगता केले आहे. आणि आजच्या पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलून ठेवले आहे. अशा या वीरगनांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडून त्या समोर गेल्या आणि पत्रकारिता
आपल्या अंगीकारून त्या निर्भीडपणे लिहीत गेल्या, त्यांना त्यांच्या कामाची शाश्वती मिळत गेली. व नवीन प्रेरणा उतेजना मिळत गेल्या आणि आपली कामगिरी बजावत गेल्या. पण लोकांनी त्यांचा काही पिच्छा सोडला नाही आणि उगवत्या सूर्येचा अंत झाला. मग आजही पत्रकारिता क्षेत्रातल्या स्त्रिया आजही मनात कायम भीती ठेऊन या क्षेत्रात येण्याचं टाळतात आणि जरी आल्या तर फक्त जितकं सांगितलं तेवढ्यापुरती काम केलं आणि निघून जाणे. पत्रकारिता क्षेत्र म्हटलं कि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे . म्हणून आजची पत्रकारिता न्याय देण्याचं काम नाही तर न्याय हिरावून घेण्याचं काम करत आहे,त्यामुळे महिलांनी नटूनथटून येऊन माहिती देऊन चालले जाणे इतकीच जबाबदारी नसून माहितीची सत्यता,वास्तविकता, रोखठोक पणे मांडून आपली देशाप्रति असलेले आपले ऋण फेडावे आणि आपल्या कामाची छाप निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– ८ मार्च महिला दिनी आपल्या सर्वाना शुभेच्छा काही वेगळं करा आणि धाडसाने करा ….
कोमल इंगळे
मेळघाट, अमरावती