नवी दिल्ली : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे भाजपचे नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पोहोचले आहे. राज्यातील परिस्थिती पाहता राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी आठवलेंनी केली आहे.
जो पयर्ंत उद्धव ठाकरे यांचे सरकार आहे तोपयर्ंत योग्य चौकशी होणार नाही, अशी टीका आठवलेंनी केली. महाराष्ट्रात स्थिती खराब होत आहे. त्यामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांची भेट घेतली आहे. यापूर्वी दहशतवादी असे प्रकार करीत होते पण आता पोलीस करीत आहे.
चौकशी करण्याची मागणी अनिल देशमुख करीत आहे. देशमुख यांना महविकास आघाडीचे संरक्षण देत आहे. तर चौकशी कशी होणार. त्यामुळे राष्ट्रपती यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली असल्याची माहितीही आठवलेंनी दिली. राष्ट्रपती यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही आठवले यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळांनी २४ मार्च रोजी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा – रामदास आठवले
Contents hide